Devkund Waterfall देवकुंड धबधबा

Devkund Waterfall-देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा Devkund Waterfall हा रायगड जिल्ह्यातील भीरा या गावात आहे. समुद्रसपाटीपासून 2700 फूट उंचीवर हा धबधबा आहे या धबधब्यातून जवळपास 80 फुटावरून तलवार पाणी पडते. देवकुंड धबधबा हा कुंडलिका नदीचे उगम स्थान आहे.

देवकुंड धबधबा कोठे आहे

देवकुंड हा धबधबा भिरा या गावात असून गावापासून ते देवकुंड असा 5 ते 7 किलोमीटर असा ट्रेक आहे आणि इथे पोहोचण्यासाठी अंदाजे दोन ते तीन तास लागतात.

जवळच्या शहरांपासून देवकुंडचे अंतर

  • मुंबई ते देवकुंड 160 किलोमीटर
  • पुणे ते देवकुंड 70 किलोमीटर
  • रायगड ते देवकुंड 60 किलोमीटर

देवकुंड धबधब्याची गुगल मॅप लिंक आर्टिकल च्या शेवटी टाकली आहे.

वाहतुकीचा मार्ग

जर तुम्ही देवकुंडला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करत असाल तर तुम्हाला तिथे पोहोचायला खूप वेळ लागेल.

जर तसेच जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर माणगावच्या दिशेने जाणारी बस पकडावे लागेल आणि तिथून पुन्हा तुम्हाला एक लोकल ऑटो शोधावी लागेल.

तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला पालीला जाणारी बस पकडावी लागेल आणि तिथून पुन्हा स्थानिक वाहतूक करावी लागेल.

पाण्याचा प्रवाह वरचा लाकडी पूल

तुम्ही ट्रेकला सुरू सुरुवात केल्यानंतर एक दीड तासानंतर तुम्हाला एक पाण्याचा प्रवाह येतो आणि ज्या प्रभावावर तेथील एका स्थानिक लोकांनी तिथे लाकडी पूल बांधला आहे आणि जर तुम्हाला त्या लाकडी पुलावरून जायचं असेल तर ते एक दहा रुपये घेतात तुम्ही त्याच्या साईडने सुद्धा जाऊ शकता पण ते खूप रिस्की असते शक्यतो त्या पुलावरूनच जावे.

देवकुंड धबधबा ट्रेक अवघड आहे का?

या ट्रेकला तसे अवघड ही म्हणता येणार नाही पण काही ठिकाणी वरती चढण्यासाठी थोडा चढणीचा भाग आहे अन्यथा इतर ट्रिक्स सोपा आहे आणि हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तास लागतात.

देवकुंड धबधबा किती खोल आहे?

देवकुंड धबधब्याचे पाणी च्या तलावात येते त्या तलावाची साधारण खोली 60 फूट आहे आणि तिथे कोणालाही जाण्याचे परवानगी नाही पर्यटकांसाठी एक सीमा म्हणून तिथे एक आडवी दोरी बांधली जाते त्याच्या पलीकडे कोणालाही जाण्याचे परवानगी नसते.

देवकुंड धबधब्याजवळ हॉटेल्स आहेत का?

तसे भिरा या गावात असे मोठे हॉटेल्स नाहीत पण तुम्ही तेथून स्नॅक्स घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या सोबत पाणी आणि थोडेसे स्नॅक्स कार्य करावे लागेल कारण पाच ते सहा किलोमीटरच्या ट्रेकमध्ये तुम्हाला पाणी वगैरे भेटणार नाही. पण काही मधल्या पट्ट्यात काही लोक जसे की पाणी किंवा कणीस हे घेऊन विकायला बसलेले असतात.

देवकुंड धबधब्याला कोणत्या महिन्यात भेट द्यावी?

या धबधब्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकत होता. बघण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सप्टेंबरचा मध्य आणि नोव्हेंबर च्या अखेरपर्यंत तुम्ही कधीही भेट देऊ शकता.

पावसाळ्यात म्हणजे जूनच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या आखरीपर्यंत हा धबधबा बंद ठेवला जातो कारण पावसाळ्यात काही अपघात घडल्यामुळे स्थानिक अधिकारी या काळात धबधबा बंद ठेवतात.

देवकुंड धबधबा गुगल मॅप लिंक

Devkund Waterfall Map Link

Leave a Comment