Ajit Dada-2019 मध्ये पहाटेच्या शपथविधी मध्ये नेमकं काय झालं होतं? अजितदादांचा मोठा खुलासा

Ajit Dada -2019 च्या शपथविधीचा दादांनी केला गौफ्यस्फोट

अजित दादा म्हणतात की 2019 च्या निवडणुकांच्या आधी  भाजपचे वरिष्ठ आणि सुनील तटकरे यांची चर्चा झाली होती तर त्यावेळेस भाजपकडून असं बोलण्यात आलं की शिवसेना हा आमचा 25 वर्षापासूनचा मित्र पक्ष आहे आम्ही त्यांना सोडणार नाही जर निवडणुका झाल्यास तर त्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी असा एकत्र लढलो पाहिजे.

त्यावेळेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे असे म्हणणे आले की शिवसेना आपल्याला चालत नाही ते जातीवादी आहेत. पण त्यानंतर भाजपने पण काही ऐकले नाही त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. त्यामुळे ती गोष्ट तिथेच बारगळली.

बड्या उद्योगपतीच्या घरी झाला प्लॅन

2019 च्या विधानसभेचा निकालानंतर एका उद्योगपतीच्या घरी वरिष्ठांची मीटिंग झाली त्या मिटींगला अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा होते आणि त्यांना असे सांगण्यात आले की तुम्ही दोघांनी कोणालाही काही बोलायचे नाही या मीटिंगमध्ये प्रफुल्ल पटेल सुद्धा होते. पण त्यानंतर काही प्लॅन फीस कटला आणि नंतर आपण शिवसेनेबरोबरच जायचे असे ठरवले त्यानंतर अजितदादांच्या असे म्हणणे आले की म्हणजे तुम्हाला 2017 ला ती जातिवादी वाटत होते आणि 2019 ला अचानक तुम्हाला आता भाजप जातीवादी वाटायला लागली.

अजित दादांनी उद्धव ठाकरेंना दिली होती एकनाथ शिंदेच्या बंडाची कल्पना

यामध्येच अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना पण सांगितले होते की शिवसेनेत काहीतरी अस्वस्थता आहे तुम्ही थोडसे लक्ष द्या. पण जे घडायचं होतं ते घडले एकनाथ शिंदे यांनी वेगळे भूमिका घेतली आणि ते भाजपसोबत गेले.

सहीच्या पाठिंबांचे पत्र

त्यामध्ये दादांनी सहीच्या पाठिंब्याचा पण किस्सा सांगितला. दादांनी सांगितले की त्यावेळेस सर्वांनी सह्या केल्या होत्या आणि ते पत्र ड्राप केले होते ते हसन मुश्रीफ त्यांनी त्यावेळेस ते बोलत होते की आपल्या वरिष्ठांना विनंती करा की आपल्याला सरकारमध्ये जावे लागेल तेव्हा आपल्याला लोकांचे कामे करता येईल. आणि यामध्ये दादांनी असेही बोलले की जर कोणत्याही एका आमदाराने या उठून सांगाव की यात काही खोट आहे माझ्याकडे अजून पण त्या पत्राची झेरॉक्स कॉपी आहे.

हेही वाचा : अजित दादांचे बंड आणि पुन्हा एकदा झाले उपमुख्यमंत्री

शरद पवारांचे राजीनामा नाट्य

यामध्ये दादांनी पवार साहेबांच्या राजीनाम्याचा किस्साही सांगितला त्यांच्यामध्ये पवार साहेबांनी सांगितले की मी आता राष्ट्रीय पदाचा राजीनामा देतो आणि संस्थाचे काम बघतो तुम्ही सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असे त्यांचे म्हणणे आले त्यावर दादा म्हणाले की आम्हाला ते मान्य आहे काही प्रॉब्लेम नाही पण दादांच्या मते दोन दिवसांनी परत काय झालं त्यांनी राजीनामा मागे घेतला दादा म्हणले जर राजीनामा मागे घ्यायचाच होता तर मग दिला कशाला.

Leave a Comment