Ajit Pawar Live News महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप अजित पवार झाले उपमुख्यमंत्री?

Ajit Pawar Live News अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप अजित पवार  हे पुन्हा झाले उपमुख्यमंत्री. Ajit Pawar Live News

अजित पवार यांनी घेतली पत्रकार परिषद या पत्रकारपरिषदेत प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ सुध्या या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत होते.

विकासाच्या मुद्यावर अजित पवारांनी आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी शिंदे आणि फडणवीस या सरकारला पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रवादी पक्षाकडून अजून आमदारांचा आकडा काही अजून सांगण्यात आला नाहीये.

यामध्येच संजय राऊत यांचे असे म्हणणे आले आहे की एकनाथ शिंदे यांच्यावर डिस्क क्वालिफिकेशन ची तलवार लटकून आहे आणि त्यामुळे काही दिवसात नवीन मुख्यमंत्री तुम्हाला दिसेल हे माझे भाकीत नसून हे फिक्स आहे आणि हे होणार आहे याची कुन कुन आम्हाला आधीपासूनच होती

अजित दादांबरोबर आठ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. शपथ घेतलेल्या आमदारांची यादी खालील प्रमाणे

१) अजित पवार
२) आदिती तटकरे
३) दिलीप वळसे पाटील
४) हसन मुश्रीफ
५) छगन भुजबळ
६) अनिल पाटील
७) संजय बनसोडे
८) धर्मरव आत्राम
९) धनंजय मुंडे

अजित पवारांच्या असे म्हणणे आहे की इथून पुढे आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढवू आणि सर्व आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे परंतु या पत्रकार परिषदेत जयंतराव पाटील किंवा सुप्रिया सुळे या दिसल्या नाहीत त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा अजून काही गेम प्लॅन आहे का हे काही सांगता येत नाही.

तसेच यामध्ये महाविकास आघाडी मधील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या असे म्हणणे आले आहे की त्यांचे जयंतराव पाटील यांच्याशी फोनवर बोलणे झाले पण त्यांनी सुद्धा अजून काही निर्णय घेतलेला नाही.

Leave a Comment