Ram Mandir Ayodhya Location: बाबरी मस्जिद च्या जागेवर राम मंदिर आहे कि नाही हे आपण जाणून घेवुयात
Ram Mandir Ayodhya Location : अयोध्यातल्या श्रीराम मंदिरात होणारा श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता काही दिवसांवर आले आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला असणारी उपस्थिती, अनुपस्थिती या गोष्टी चर्चेत असतानाच आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली हे म्हणजे राम मंदिर उभे राहते ती जागा. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होते गुगल मॅप फोटोमध्ये दोन ठिकाणांना गोल करण्यात आले आहेत पहिला गोल आहे श्री राम जन्मभूमी टेम्पल अयोध्या या ठिकाणाचा आणि दुसऱ्या गोलातल्या ठिकाणी दिसते बाबरी मस्जिद. यावरूनच भाजप सरकारवर टीका केली जाते की भाजपने बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेत मंदिर न बांधता दुसऱ्याच जागेवर बांधलाय.
संजय राऊतांची Ram Mandir Ayodhya Location विषयी पत्रकार परिषद
मंदिर वही बनायेंगे मधला वहीचा वादा खोटा आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सोमवारी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले आपण जिथे मंदिर बांधण्याचा अट्टाहास करत होतो तेथे मंदिरच झालेले नाही. तेथून ४ km दूर मंदिर बांधण्यात आले आहे. वादग्रस्त भूखंड आज ही तसाच आहे. राऊत यांच्या वक्तव्यानंतर इतरही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राम मंदिर राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेलं नाही असा आरोप केला. बऱ्याच ठिकाणी या आरोपांचा संदर्भ म्हणून गुगल मॅपचा व्हायरल फोटो वापरण्यात आला पण फोटो मागचे सत्य काय आहे राम मंदिर वादग्रस्त भूखंडावर बांधलं जातंय की दुसऱ्याच जागेवर बाबरी मशिदीचे लोकेशन दिसते तिथे नेमकं काय आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या लेखामधून.
मंदिर उभारणीची timeline व त्यासाठी लागलेली जमीन
सगळ्यात आधी बघुयात मंदिर उभी राहण्याची timeline डिसेंबर 1992 ला बाबरी मशिदीचा डाचा पाडल्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सरकारने बाबरी मशिदीच्या जागेसह एकूण ६७ एकर जमीन अधिग्रहित केली होती. याच जागेतली 2.77 एकर जमीन हे राम जन्मभूमी मानले जाते. आज 2.77 एकरचा भूखंड कोणाच्या मालकीचा आहे. याचा वाद कोर्टात पोहोचला ज्यावर अनेक वर्ष कार्यवाही सुरू होती. यासगळ्यात जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा ती जागा सपाट करण्यात आली. आणि त्याच जागेवर श्रीरामंची एक मूर्ती स्थापन करण्यात आली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर: राम मंदिर ट्रस्टला २.७७ एकर जागा देण्यात आली, अयोध्येतील मशीदसाठी पाच एकर वक्फ बोर्डला
मग ९ नोव्हेबंर २०१९ ला सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीच्या प्रदीर्घ खटल्यावर आपला निकाल जाहीर केला ज्यात 2.77 एकर जागा हे राम मंदिर ट्रस्ट ला देण्यात आली. सोबतच कोर्टाने वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येच पाच एकर जागा देण्यात यावी असे निर्देशही दिले.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायच्या आधी राम जन्मभूमीवर असलेल्या रामल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेता येत होतं. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर श्रीराम मंदिर उभे राहण्याबाबत हालचाल सुरू झाली तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम जन्मभूमी मधले रामाची मूर्ती राम जन्मभूमीतला जागेत 100 मीटरवर नेली आणि मंदिर उभे राहेपर्यंत ही मूर्ती इथे असेल आणि मंदिर उभा करताना मुळ जागेवर गर्भगृह बांधण्यात येईल. आणि त्यात या मूर्तीची पूजा केली जाईल असे सांगण्यात आलं मग राम मंदिर उभ करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर सरकारने अधिग्रहण करण्यात आलेली 67 एकर जमीन राम मंदिर ट्रस्टला दिले यातल्याच वादग्रस्त 2.77 एकर जमिनीवर राम मंदिर उभे राहते.
राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर आणि बाबरी मज्जित: सॅटेलाइट इमेज आधारित अन्वेषण
राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिराचे गर्भ गृह बांधण्यात येते थोडक्यात काय तर श्रीराम मंदिर हे त्या विवादित जागेवर बांधण्यात येतेय मग viral फोटोमध्ये वेगवेगळे ठिकाण कशी दिसत आहेत. याचे नेमके सत्य काय आहे. तर फोटोच आपल्याला दोन ठिकाणी दिसतात. आपल्याला सध्या राम मंदिराचं काम सुरू असलेले राम जन्मभूमी दिसते आणि जिथे बाबरी मज्जित परिसर.
आता हेच लोकेशन आपण गुगल मॅप वर टाकून पहिले तर सध्या आपल्याला राम मंदिराचे काम सुरु असलेली रामजन्मभूमी दिसते आणि जिथे बाबरी मस्जित परिसर हा उल्लेख आढळतो. त्या ठिकाणी गुगलच्या सॅटेलाईट मॅप मधून पाहिलं तर श्री सीताराम मंदिर, बिर्ला मंदिर हे ठिकाण दिसते दोन्ही ठिकाणे झूम करून पाहिले तर सॅटॅलाइट इमेज नुसार रामजन्मभूमीच्या ठिकाणी आपल्याला राम मंदिराचे सुरू असलेलं काम दिसतं तर बाबरी मज्जित परिसर असा उल्लेख ज्या ठिकाणी करण्यात आलय तिथे उभा असलेल्या श्री सिताराम मंदिर दिसून येत viral झालेल्या फोटोत मंदिराच्या जागी मशिदीचा परिसर कसा दिसत होता.
मंदिराच्या जागेच्या review मध्ये कोणीतरी बाबरी मशिदीचा फोटो ॲड केला होता आणि ठिकाणाचं नाव हे बदललं होतं. या चुकीच्या मार्किंगमध्ये या ठिकाणचे नाव बाबर मस्जित असं केलं होतं तर ते परमनंटली क्लोज असल्याचे नोंद केली होती त्यामुळे बाबरी मशीद होती त्याच्यापासून काही किलोमीटर अंतरावर श्रीराम मंदिर बांधण्यात येते हा दावा करण्यात येत होता जो चुकीचा ठरतो.
“Alt News वेबसाइट ने गुगल earth मॅपचा वापर करून काही सॅटॅलाइट इमेजेस मिळवले आहेत. ज्यात 2011 ला मंदिराचा बांधकाम सुरू नव्हतं तेव्हाच्या विवादित जागेचा फोटो दिसतो आणि 2023 मध्ये मंदिराचा बांधकाम सुरू असतानाचा फोटो दिसतो. यातून दोन्ही ठिकाणी एकच असल्याचे खात्री पटते सोबतच बाबरी मशिदीचे काही जुने फोटोज आणि सध्या राम मंदिराचे काम सुरू असलेले ठिकाण यांचेही संदर्भ जोडण्याचा दिसून येत ज्यावरून हे स्पष्ट होतं की जिथे बाबरी मशीद उभी होती त्याच ठिकाणी श्रीराम मंदिर उभे राहते.”
व्हायरल फोटो दिसणाऱ्या बाबरी मज्जित परिसरामुळे आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे अयोध्येत उभे राहणारे मशीद सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीचा निकाल देताना वक्फ बोर्डाला पाच एकर जागा देण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारनं ही पाच एकर जागा दिलीली जिथे मस्जित ए अयोध्या उभे राहणार आहे ती जागा आहे ध्ननिपूर. येथे ध्ननिपूर हे अयोध्या जिल्ह्याच्या फैजाबाद मध्ये असलं तरी ते अयोध्या शहरापासून 24 किलोमीटर लांब आहे. या मशिदीसाठी जागा अलोट झाली असली तरी फंडस् अभावी तर बांधकाम सुरू झालेला नाही फोटो दिसणाऱ्या बाबरी मज्जिद परिसर या ठिकाणाचा मस्जित ए अयोध्याचा काहीही संबंध नाही. मुळात ते ठिकाणाच सिताराम मंदिराचा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा करायला विसरू नका.
[Whats App Group] Click to Join Whatsapp Group (व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा)