Sharad Mohol | शरद मोहोळच्या खुनाचा मास्टरमाईंड सापडला, कोणी केला शरदाचा गेम? हे जाणून घेऊयात.
Sharad Mohol हत्येच्या अवघ्या 48 तासात पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यानंतर ही अटक सत्र सुरू होतं पण अखेरीस आता पोलिसांच्या हाती मोहोळच्या हत्तेमागचा मास्टरम सापडलाय. हा मास्टरमाईंड कोण आणि पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, मोहोळच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या चौथ्या पिस्तुल्याचा कनेक्शन काय, अशा मोहोळच्या हत्तेशी संबंधित काही महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
एका केलेल्या फोनमुळे मुख्य मास्टरमाईंडचा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
Sharad Mohol ची ५ जानेवारीला हत्त्या झाली आणि या हत्याकांडातील प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याची चर्चा सुरू झाली. पण थांबा तब्बल 20 अटका झाल्यानंतर आता शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाइंड समोर आलाय. रविवारी रात्री वाशी पनवेल भागामध्ये क्राईम ब्रांच पोलिसांनी धाड टाकून या मास्टरमाईंडसह सुमारे १० जणांना ताब्यात घेतलं आहे. Sharad Mohol ची हत्या झाली आणि त्यानंतर एक फोन केला मोहोळचा गेम केलाय मास्टर ला सांगा. संतोष कुरपेला हा फोन आला आणि पलीकडच्यांना मोहोळच्या हत्येची माहिती देण्यात आली होती. हा फोन मुन्ना पुणेकर केला होता. हत्या केल्यानंतर मुन्ना कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होता त्यावेळी एका व्यक्तीकडून सिम कार्ड घेऊन त्यांना हा फोन केला होता. पोलिसांकडे या फोनचा रेकॉर्डिंग सुद्धा आहे. त्या सिम कार्ड वरून मुन्नाने संतोष कुरपेला फोन केला होता. पण मोहोळच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या यास फोन मुळे खरंतर मास्टरमाईंड अडकला.
Sharad Mohol प्रकरणात पोलिसांच्या चौकशीत २ मोठया गँगस्टर नावे समोर
त्या संतोष कुरपेला 11 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं होतं. याच्या आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतूनही मिळालेली माहिती ही पोलिसांना महत्वाची ठरली. संतोषने ही चौकशीत रामदास मारण्याचे नाव घेतलं या प्रकरणात तब्बल दोनदा मोठ्या गँगस्टरला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होता.
असा दावा करण्यात येतोय की कुरपेला हा फोन अनोळखी नंबर वरून आला होता आणि त्यामुळे त्याने तो फोन उचलला होता. या सगळ्या माहिती नंतर पोलिसांना पूर्ण खात्री होती की Sharad Mohol ची हत्या ही मुन्ना पोळेकरने कोणाच्यातरी सांगण्यावरून केली आहे. फक्त आरोपी नेमक्या कोणत्या भागात आहेत याचा छडा पोलिसांना लागत नव्हता.
पोलिसांची वाशी आणि पनवेल मध्ये धाड
पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेले आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशी आणि पनवेल मध्ये धाड टाकली. तिथून सुमारे दहा जणांना अटक केलेली आहे. विठ्ठल शेलार रामदास उर्फ वाघ्या मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाईंड क्राईम ब्रांच च्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला दहा जणांपैकी तीन जण हे संशय इतर तीन जण हे आरोपी आहेत. मोहोळ च्या हत्येनंतर हे आरोपी वाशी आणि पनवेल मध्ये लपून बसले होते. पनवेल पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली आहे.
Sharad Mohol यांची जमिनीच्या वादातून हत्त्या कि काही राजकीय काळेबेरे
जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जाते पण पोलीस वाघ्या आणि विठ्ठल शेलार यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतायेत. दरम्यान रामदास उर्फ वाघ्या मारणेचे नाव संतोष कुरपेने घेतले त्यामुळे मारणेला अटक केली. तर रामदास मारणे हा मारणे गँगचा गुंड नाही तर तो विठ्ठल शेलार गॅंगमधला एक गुंड आहे अशी माहितीसुद्धा समोर आली आहे. याचाच अर्थ Sharad Mohol ला मारणाऱ्या आरोपीच्या मागे मारणे गॅंग नव्हती एवढे मात्र यातून आत्ता स्पष्ट होतंय. पण यातून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे.
विठ्ठल शेलार याची पैसे, माणसे आणि पिस्तूल पुरवण्यात मदत
या प्रकरणात वाघ्या मारणे चे नाव येत असले तरी घेत असलं तरी देखील मुख्य आरोपी हा शेलार यांचा मोरख्या विठ्ठल शेलार च असल्याचे बोलले जात आहे. पोलीस याबाबतीत अधिक माहिती घेतायेत. मुन्ना मुळेकर कडून आणि संतोष कुरपेकडून अधिकची माहिती पोलीस मिळवल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. पण जमिनीचा वाद की जुना कोणता वाद याची माहिती सध्या पोलीस आरोपींकडून घेताय दरम्यान मोहोळ ला मारण्यासाठी चार पिस्तूल मध्य प्रदेशातून साताऱ्यातल्या कराडच्या शरद भटकरने विकत घेतली होती. ही पिस्तूल विकत घेण्यासाठी पैसे आणि माणसांची मदत ही विठ्ठल शेलार ने केली होती. ३ पिस्तुले ही पोलिसांच्या ताब्यात आहे पण चौथ्या पिस्तुलाबाबतची माहिती आता विठ्ठल किंवा वाघ्या मारणेकडून समोर येण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे. मास्टरमाईंड समोर आलाय पण या मास्टरमाईंच्या मागे इतर कोणाची प्रेरणा होती का किंवा कोणाचा राजकीय वरदहस्त होता का याची माहिती सध्या पोलीस घेतायत. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच घटनानबद्दल जाणून घ्यायचे खालील दिलेल्या लिंक वरून Whats app ग्रुप ला जॉईन करा.
[Whats App Group] Click to Join Whatsapp Group (व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा)